द्राक्ष बागायतदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी!

 फळबागांमध्ये राज्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र देखील खूप मोठे असून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आकडेवारीत बघितले तर राज्यात एक लाख 23 हजार 424 हेक्टर क्षेत्र हे द्राक्ष पिकाखाली असून राज्यातून सुमारे 24 लाख 89 हजार 268 मॅट्रिक टन एवढे द्राक्षाचे उत्पादन होते. अहिल्यानगर, नासिक तसेच सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आपल्याला माहित आहे की द्राक्ष पिक अतिशय संवेदनशील असल्याने हवामान बदलाचा खूप विपरीत परिणाम द्राक्ष पिकावर होतो.

गेल्या काही वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना या संकटातून आणि हवामान बदलामुळे जे काही द्राक्ष बागांचे नुकसान होते त्याकरिता क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

तसेच द्राक्ष फळ पिकावर हवामान बदलाचा खूप मोठा विपरीत परिणाम होतो व हा परिणाम किंवा प्रभाव कमी करण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्या माध्यमातून सातत्याने निरीक्षण व त्यानुसार सल्ला देखील देण्यात येत आहे. इतकेच नाही तर त्यांनी पुढे म्हटले की द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता बैठकीचे आयोजन लवकरात लवकर केले जाणार असून या बैठकीमध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधींना देखील बोलावले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पावसात नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना मिळणार आर्थिक मदत?

इतकेच नाही तर अवकाळी पावसामुळे जे काही द्राक्ष फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्या भागांचे पंचनामे करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना शासनाचे जे काही निकष आहेत त्यानुसार मदत करण्यात आली आहे व अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे व ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्यांना शासन निकषानुसार मदत दिली जाणार असल्याची माहिती देखील कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली. इतकेच नाही तर हवामान बदलाची माहिती शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावी याकरिता प्रत्येक गावामध्ये आता वेदर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *