राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतीतील पायाभूत सुविधा तसेच फळ पिकांच्या लागवडीसाठी अनेक प्रकारे मदत केली जाते व यामध्ये बऱ्याचदा अनुदान स्वरूपात मदत ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. या योजनांमध्ये सरकारची महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही एक खूप महत्त्वाची योजना असून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थीला सलग शेतावर तसेच बांधावर आणि पडीक जमिनीवर विविध प्रकारची फुल तसेच फळ पिकांची लागवड करता येते व इतकेच नाही तर मसाला पिकांची लागवड देखील केली जाऊ शकते.
शेतीविषयक मोफत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ही एक महत्त्वाची योजना असल्यामुळे तिची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत राबवली जाते. यामध्ये विविध फळ असेच फुलपिके व मसाला पिकांचा लागवड कालावधी माहे जून ते मार्च दरम्यान असतो व ज्या लाभार्थ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांना मार्चपर्यंत लागवड करता येते.
या फळपिकांची करता येते लागवड
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आंबा,काजू,चिकू, पेरू, डाळिंब,संत्रा,मोसंबी,कागदी लिंबू,नारळ( बाणवली/ टी.डी), बोर,सीताफळ,आवळा,चिंच,कवट,जांभूळ, कोकम, फणस,अंजीर,द्राक्ष,केळी( तीन वर्ष), सुपारी,साग,गिरीपुष्प,कडुलिंब,सिंधी,शेवगा,हादगा,बांबू,जट्रोफा, कढीपत्ता,पानपिंपरी,करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश होतो.
विदेशी पिके
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट,अव्होकॅडो आणि नफ्रूट सारख्या विदेशी फळांची लागवड देखील करता येते तसेच फुल पिकामध्ये गुलाब, मोगरा, निशिगंध आणि सोनचाफा व मसाला पिकांमध्ये लवंग, दालचिनी, जायफळ आणि मिरी पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
पात्रतेचे निकष काय?
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. तसेच जमीन जर कुळ कायद्याखाली येत असेल व सातबारा उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. तसेच लाभार्थी हा जॉब कार्ड धारक असावा.
कोणाला मिळतो या योजनेचा लाभ?
या योजनेचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाती तसेच जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती( विमुक्त जमाती), दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेले कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखाली लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी( वन हक्क मान्य करणे), अधिनियम 2006(2007 चा 2) इत्यादी
वरील पात्र व्यक्ती योजनेखाली लाभार्थींना लागवड केलेली फळझाडे/ वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत पिकांचे 90% आणि कोरडवाहू पिकांचे 75 टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदान देण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 0.05 हेक्टर ते दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत फळझाड लागवड करता येते.