सरकारच्या प्रत्येक योजनांचा आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आधाराकार्ड प्रमाणेच युनिक फार्मर आयडी गरजेचं आहे… आज आपण युनिक फार्मर आयडी कसा काढायचा आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात…
फार्मर आयडीचे फायदे (Benefits Of Farmer ID)
-फार्मर आयडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा युनिक आयडी मिळणार आहे.
-या फार्मर आयडीमुळे शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह करता येणार आहे.
-शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळणार आहे.
-पीएम किसान योजना, अनुदाने, कृषी कर्ज, पीक विमा यासाठी शेतकऱ्यांना लगेचच मदत मिळणार आहे.
-किसान क्रेडिट कार्ड, कृषी फंड, शेतजमिनीवर कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार आहे. तुमची नुकसान भरपाईसाठीचीही प्रोसेस लवकरात लवकर होणार आहे.
-याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शेतमाल विक्री करू शकतात. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनदेखील मिळणार आहे.
Farmer ID कसा तयार करायचा?
-सर्वात आधी गुगलवर तुम्हाला Agristack Maharashtra असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर खाली महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आली असेल.
Farmer ID कसा तयार करायचा?
-सर्वात आधी गुगलवर तुम्हाला Agristack Maharashtra असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर खाली महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आली असेल.

-त्यानंतर होमपेजवर तुम्हाला दोन पर्याय मिळतील.. त्यावर तुम्हाला फार्मर यावर क्लिक करायचं आहे.

-त्यांनतर तुम्हाला Create New User यावर क्लिक करायचं आहे.

-आता तुम्हाला येथे तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचं आहे.

-त्यानंतर ओटीपी टाकून त्याला Submit करा.

-आता तुमच्यासमोर एक नवीन पेज आलं असेल… त्यात तुमचं नाव आणि KYC Details दिसत असतील…

-त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा Agristack link ला जो नंबर टाकायचं आहे तो येथे टाका.

-आता पुन्हा तुम्हाला एक OTP येईल..

OTP भरा.. आणि पासवर्ड सेट करा…
आता तुमचं अकाऊंट अॅक्टिव्ह झालं आहे..

– आता तुम्हाला पुन्हा मोबाईल क्रमांक आणि पासर्वड टाकून लॉगिन करायचं आहे..

-लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर केवायसी पेज ओपन झालं असेल.

– तुम्हाला विचारण्यात येईल की, तुमचं मोबाईल नंबर बदलायचं आहे का? तर त्याला No असं निवडा.
– आता तुम्हाला मराठी भाषेत तुमचं नावं लिहायचं आहे.. पण लक्षात ठेवा तुम्हाल स्पेस, फूल स्टॉप असं काहीही वापरायचं नाही..

– खाली तुमची कास्ट निवडा.

– खाली एका ठिकाणी तुम्हाला Residential Details भरायची आहे..

– तुम्हाला Land Holder Details मध्ये तुम्हाला OWNER असं निवडायचं आहे.
-त्यानंतर तुम्हाला Occupation Details मध्ये Land owning Farmer आणि Agriculture हे दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत..

– आता तुम्हाला येथे जमीनीची माहिती द्यायची आहे. तुम्हाला येथे गट नंबर आणि खाते नंबर भरायचे आहे.
– आता तुमच्यासमोर तुमच्या जमीनाचा तपशील भेटेल. त्यावर क्लिक करा.

– land Type मध्ये Agriculture असं निवडा.

– Land Holder Details टाकायची आहे..त्यानंतर Add Land वर क्लिक करा. त्यानंतर खाली आता तुम्हाला तुमच्या जमीनीची माहिती आली असेल..

-आता Verify All Land यावर क्लिक करून घ्या..

-तुम्हाला Department Approval म्हणजे महसूल विभाग असं पर्याय आलं असेल..त्यावर Revenue यावर क्लिक करा..

– खाली टर्म आणि कंडिशनवर क्लिकवर आणि Save करा…
– त्यानंतर Esign यावर क्लिक करायचं आहे.

– पुन्हा टर्म आणि कंटीशन वाचून सिलेक्ट करा..

– आता तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचं आहे. ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या..

-आता तुमच्यावर मोबाईलवर एक मॅसेज येईल.. आणि त्यात तुम्हाला तुमची नोंदणी झाली आहे.. असं सांगण्यात येईल…