जनावरांमध्ये त्वचा विकारांवर कडूनिंब, हळद उपयुक्त

जनावरांमध्ये विविध प्रकारांतील त्वचा विकार मोठ्या प्रमाणात आढळतात. त्वचा विकाराचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जनावरांच्याकडे दुर्लक्ष आणि विकाराचे अयोग्य निदान आणि उपचार हे आहे.

शेतकऱ्यांनी प्राथमिक स्वरू

पातील त्वचा विकाराचे निदान आणि उपचारदेखील पशुवैद्यकाद्वारा करावेत.

त्वचेवर एखादा चट्टा किंवा पुरळ येतात, त्या भागास खाज सुटणे, गोठ्यातील भिंतीस अथवा खांबास जनावर अंग घासते, त्वचा रोगग्रस्त भाग लाल होतो. ही त्वचा विकाराची सुरवातीची लक्षणे आहेत. यावर योग्यवेळी उपचार न केल्यास जिवाणूंचा संसर्ग होऊन या आजाराची तीव्रता वाढते.

त्वचा विकारांवर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान होणे आवश्‍यक आहे. परोपजीवी जंतूंमुळे होणाऱ्या त्वचाविकाराची अनेक कारणे आहेत.

उपयुक्त औषधी वनस्पती

कडूलिंब

लिंबोळी, कडूलिंबाची पाने औषधीत वापरतात. कडूलिंबाचे तेल हे त्वचा विकारांवर अत्यंत गुणकारी आहे.

कडूलिंबांमध्ये जीवाणू, परोपजीवी जंतू व बुरशी विरोधी गुणधर्म असल्यामुळे जवळपास सर्व प्रकारांतील त्वचा विकारांत कडूलिंबाचा अत्यंत चांगला उपयोग होतो.

कडूलिंबामुळे बाह्य परोपजीवी उदा. उवा, गोचिड इ. देखील कमी होतात, त्यामुळे त्वचा विकाराचा प्रादुर्भावदेखील कमी होतो.

कडूलिंबाचे तेल त्वचा विकारांवर बाहेरून लावावे.

करंज

करंज किंवा करंजी या नावाने ही वनस्पती ओळखली जाते.

करंजीच्या तेलातदेखील परोपजीवी जंतुविरोधी व बुरशीविरोधी गुणधर्म आहेत.

करंजी तेलाचा वापर बाह्योपचाराकरिता करावा.

अर्जुन

अर्जुन हा मोठा वृक्ष आहे. याची साल त्वचा विकार आणि रक्तस्रावावर गुणकारक आहे.

याच्या सालीचा वापर बाह्योपचराकरिता करावा.

हळद

हळदीमध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म आहेत, तसेच हळद सूजविरोधी व दाहनाशक म्हणूनही अत्यंत उपयुक्त आहेत.

हळकुंडाची पावडर, कडूलिंब, करंज तेलात मिसळून त्वचा विकारांवर लावावी.

कन्हेर

ही वनस्पती फुलांसाठी प्रसिद्ध आहे.

वनस्पतीची पाने व मूळ ओले असताना ठेचून त्याचा लेप त्वचा विकारांवर द्यावा.

या उपचारामुळे बाह्योपरोपजीवींचेदेखील नियंत्रण होते.

तुळस

तुळशीची पाने, मंजुळा अथवा यापासून काढलेले तुळशीचे तेल यात जीवाणू व बुरशी विरोधी गुणधर्म आहेत. कन्हेरप्रमाणेच पाने व मंजुळा ठेचून त्याचा लेप त्वचा विकारांवर द्यावा अथवा तुळशीच्या तेलाचा वापर करावा.

वनस्पतींचा एकत्रित वापर

कडुलिंब तेल – 20 मि.लि.

करंज तेल – 20 मि.लि.

अर्जुन – 4 ग्रॅम

हळद – 5 ग्रॅम

कन्हेर – 3 ग्रॅम

तुळस तेल – 10 मि.लि. मात्रा : वरील सर्व घटक एकत्र करून दररोज 2 ते 3 वेळेस त्वचाविकारांवर लावाव्यात

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *