तणनाशक वापर योग्य वेळ # उगवणी पूर्वी चे व उगवणी नंतर चे तण नाशके # योग्य प्रमाण # निवड आणि उपयोगिता # याविषयी उपयुक्त लेख
जवळपास सर्वच शेतकरी मित्रांची सोयाबीन पेरणी ची तयारी सुरू झालेली आहे, यावर्षी जून महिन्यात सरासरी इतका पाऊस होईल असा अंदाज आहे त्यामुळे पेरणी वेळेवर होईल, पेरणी नंतर पाऊस सारखा लागून राहिला तर तण व्यवस्थापन करणे हे एक आव्हान सोयाबीन शेती साठी आहे, त्यासाठी पेरणी पूर्वी तण नाशक फायदेशीर ठरू शकतात.
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तणनाशकांचा वापर केला जातो, हे सर्व करत असताना शेतकरी मित्रांना योग्य माहिती न मिळाल्याने ते वापर करताना चुका करतात व त्याचा फायदा होत नाही बरेच वेळा शेतकरी दोन तणनाशकांचा वापर करतात परंतु यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तण नाशक वापरताना योग्य सल्ला घेऊन योग्य प्रमाणात तसेच योग्य वेळी फवारणी करावी जेणेकरून आपलयाला चांगले तण व्यवस्थापन करता येईल. सोयाबीन पिकात प्रामुख्याने उगवणीपूर्वी तसेच उगवणीनंतर असे दोन प्रकारचे तण नाशके वापरले जातात त्यांची माहिती खालीप्रमाणे 👉🏻
उगवणीपूर्वी वापरण्यात येणारी तणनाशके
🔅 Flumioxazine 50% SC
# याची पेरणीनंतर ४८ तासाच्या आत आपण फवारणी करू शकतो
याचा १०० मिली प्रती एकर याप्रमाणे वापर करावा
सोयाबीन व गहू पिकातील गवत वर्गीय व रुंध पानाचे तण नियंत्रण होते
व्यापारी नाव : Sumimax
🔅 Pendimethalin 30 EC
750-1000 मिली प्रती हेक्टरी या प्रमाणात फवारणी करू शकता
30-40 मिली प्रती पंप याप्रमाणे पेरणीनंतर 48 तासांत फवारणी करावी,
हे जवळपास सर्वच पिकामध्ये वापरता येणारे तण नाशक आहे
व्यापारी नाव : Panida, Stomp
🔅 SULFENTRAZONE 28% + CLOMAZONE 30% WP
याचा वापर ५०० ग्राम प्रती एकर या प्रमाणात करावा
पेरणी नंतर ४८ तासांच्या आत फवारणी करावी
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण साठी शिफारशीत आहे,
गवतवर्गिय व रूंध पानाचे तण नियंत्रण करते
व्यापारी नाव : Authority NXT ( FMC )
🔅 Diclosulam 84% WDG
# याचा वापर १२.४ ग्राम प्रती एकर या प्रमाणात करता येतो
# पेरणीनंतर ४८-७२ तासांत फवारणी करू शकता
सोयाबीन व भुईमूग पिकासाठी शिफारशीत ( शेतकरी अनुभवानुसार तुरी मध्येही वापर करू शकता)
व्यापारी नावे: Strongarm / Dabooch, Tata Mark
👉🏻 सोयाबीन पिकात उगवणी नंतर वापरण्यात येणारी तणनाशके
@ Imazethapyr 10% SL
हे एक सुरवातीला आलेले तण नाशक आहे, याचा वापर ४०० ml प्रती एकर या प्रमाणे करता येतो, परंतु याने लांब पणाचे गवत वाळत नाही त्यामुळे यासोबत आपलयाला इतर तणनाशक वापरावे लागते.
व्यापारी नावे : Persuit, Weed block, Lagam
रुंध व लांब पानाच्या तण निंत्रणासाठी यासोबत Targa super # Agil # Wheep super अशा तनांशकाचा वापर करावा लागतो.
प्रमाण –
(Weed block – ४०० ml प्रती एकर +
Agil – २५०-३०० ml प्रती एकर)
👉🏻 Propaquizafop 2.5%+ Imazethapyr 3.75% w/w ME
हे दोन क्रियाशील घटक असलेले तण नाशक आहे याने रुंध व लांब पानाच्या दोन्ही तणाचे नियंत्रण होते.
व्यापारी नावे: Shaked ( Adama)
प्रमाण – ८०० मीली प्रती एकर
८०-१०० ml प्रती पंप एकरी पाण्याचे प्रमाण १५०-२०० लिटर वापरावे
👉🏻 Fluazifop-p-butyl 13.4 %EC. ( Fuziflex )
हे फक्त सोयाबीन असेल तर वापरण्यासाठी असलेले तण नाशक आहे, तूर असेल तर याचा वापर करू नये.
प्रमाण- ४००-५०० ml प्रती एकर याप्रमाणे ४० ml प्रती १५ लिटर पंप याप्रमाणे फवारणी करू शकता.
*Odyssey (Imazethapyr 35% + Imazamox 35% WG)
सोयाबीन आणि भुईमूग पिकातील सर्व प्रकारच्या तण नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता,
प्रमाण – ४० gm प्रती एकर
Iris (Sodium Acifluorfen 16.5% + Clodinafop Propargyl 8% EC)
सोयाबीन मधील सर्व प्रकारच्या तण नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता.
प्रमाण – ४०० ml प्रती एकर
AMORA ( Fomesafen 12% + Quizalofop ethyl 3% SC)
सोयाबीन पिकातील सर्व प्रकारच्या तण नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता.
प्रमाण – ६०० ml प्रती एकर या प्रमाणे
वरीलप्रमाणे तण नाशके उपलब्ध आहेत, आपले शेतात असलेले गवत तसेच, अंतर पीक यांचा विचार करून योग्य ते तण नाशक आपण निवड करू शकतो.
👉🏻
*तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी
@ पाणी हे स्वच्छ असावे ( माती मिश्रित डबके किंवा नाले यातील पाणी वापरू नये )
@ तण हे २-४ पाने या अवस्थेत असताना फवारणी करावी
@ फवारणी साठी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे एकरी १५०-२०० लिटर किंवा हेक्टरी ३५० -५०० लिटर याप्रमाणे
@ तण नाशकाचे योग्य प्रमाण एकरी प्रमाण ८०० ml असेल तर ८०० ml हे १५०-२०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे @ बरेच शेतकरी मित्र ८० ml प्रती पंप वापरून १० पंप करतात परंतु एकरी ५ पंप याप्रमाणे फवारणी करतात त्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट मिळत नाहीत.
👉🏻 सोयाबीन पीक हे १२-२० दिवसाचे असताना च फवारणी करावी @ २५ दिवसाचे पीक झाल्यानंतर फवारणी करू नये
👉🏻 तण नाशक हे उन्हाची तीव्रता कमी असेल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी
👉🏻 फवारणीच्या वेळी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे
👉🏻 तण नाशक फवारणी करताना कुठलेही टॉनिक / खत / कीटकनाशक / बुरशीनाशक यांचा वापर ( मिक्स ) करू नये त्यामुळे दोन्हीची क्रियाशीलता कमी होते.
👉🏻 कोणतेही २ च क्रियाशील घटक एकत्र करावेत त्यापेक्षा जास्त एकत्र करून फवारणी करू नये
👉🏻 प्रती पंप प्रमाण हे योग्य वापरावे व एकरी पंप यांचे सुध्दा प्रमाण वापरावे @ १५ लिटर चे एकरी कमीत कमी १० पंप होणे आवश्यक आहे म्हणजे १५० लिटर पाणी लागेल आणि जर ८० ml प्रती पंप प्रमाण असेल तर ८०० ml औषध लागेल याप्रमाणेच फवारणी करावी.
वरील सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्या व तण नाशक फवारणी करताना अमलात अनावे जेणेकरून आपल्याला चांगले तण नियंत्रण करता येईल व आपले पीक नियोजन करता येईल.
धन्यवाद 🙏🏻
डॉ अनंत उत्तमराव इंगळे
संचालक विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा