बायोमीच्या शेतक-याने अर्धा एकर खरबूजातून घेतले 2.25 लाखापर्यंत उत्पादन

उत्पादन खर्चात 50% पर्यंत घट, पेरू पिकातूनही घेतले 6.35 लाखांचे उत्पादन

लोणारवाडी ता. दौंड येथील शेतकरी संपत हिवरकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही पेरू व खरबूज पिकांच्या लागवडीतून रूपये 7.80 लाखांचे खर्च वजा जाता उत्पन्न मिळवले आहे.

पाण्याचे योग्य नियोजन, बायोमीचे मार्गदर्शन आणि बायोमीचे प्रोडक्ट्स हे माझ्यासाठी वरदान ठरले.

गेल्या अनेक वर्षापासून उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या हिवरकर यांनी यंदा सर्व शेती बायोमीचे मार्गदर्शन आणि 100% बायोमीची उत्पादने वापरून केली आहे. खरबूजाच्या अर्ध्या एकरातून केवळ 20 हजार रूपयांचा खर्च करून 9 टन मालातून 2.25 लाखांचे उत्पादन काढले; ज्यामध्ये त्यांना 2 लाखाहून अधिक खर्च वजा जाता निव्वळ नफा झाला. फोटोफास्ट, फॉस्फोफास्ट, पॅसिलोमायसेस, रूट स्पेशल, बीवीएम व साईजर हे बायोमीचे प्रोडक्ट्स वापरल्याने पिकावर कुठल्याही प्रकारची कीड व रोग आढळून आला नाही व फळाची साईज आणि चकाकीही चांगली राहिल्याचे सांगतानाच मागील वर्षी हाच उत्पादन खर्च 80 हजार रूपयापर्यंत झाल्याचे हिवरकर सांगतात.

पहिल्या तोड्याला 40 क्रेट बाजारात नेल्यावर रूपये 25 चा दर किलोला मिळाला आणि शेवटच्या तोड्यापर्यंत तोच रूपये 25 चा रेट मला मिळाला.त्यानंतर जेव्हा जेव्हा माल बाजारात गेला, माझ्या मालाच्या खरेदीनंतरच इतर मालाची खरेदी झाली. बायोमीमुळे बाजारात मालाचा दर्जा आणि शेतकरी म्हणून माझी किंमतही वाढली त्याचा अभिमान वाटत असल्याने हिवरकर सांगतात. यापूढे बायोमीशिवाय काहीच वापरायचे नाही असं ठामपणे सांगतात.

त्यांनी पेरूचीही लागवड नव्यानेच केली असून ४२५ झाडांपासून पहिल्या बहारात ७ टन तर दुसऱ्या बहारात ९ टन माल, असा १६ टन पेरू निघाला. सगळा पेरू त्यांनी जाग्यावर रूपये ४० प्रति किलो या दराने विकला. बायोमीचे प्रॉडक्ट सोडून यात अन्य काहीच वापरले नसल्यानेच सांगतानाच लागवडीपासून काढणी पर्यंत हिवरकर यांना पेरू या फळपिकापासून रू ६५ हजार रुपये एवढा उत्पादन खर्च झाला असून ५.७५ लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याचे हिवरकर सांगतात.

बायोमीचे फोटोफास्ट, बॅसिलस, फ़ॉस्फोफास्ट, फॉस्फेट्री व बीवीएम हे प्रोडक्ट्स वापरल्याने रासायनिक खतांची व रासायनिक औषधांची गरज कमी झाल्याचे ते नमूद करतात.

अशा प्रकारे पिकाचे योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाले तर कुठलाही शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो आणि खाणारालाही विषमुक्त फळे देता आल्याचे सांगतानाच या प्रगतीसाठी बायोमीच्या डॉ. प्रफुल्ल गाडगे सरांचे हिवरकर आभार मानतात.

आपणही डॉ. प्रफुल्ल गाडगे सरांच्या कृषी रसायने कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊ शकता आणि बायोमीची जैविक रसायने आणि खते वापरून आपल्या जमीनीचा पोत सुधारू शकता आणि भरघोस उत्पन्न मिऴवू शकता.

चला बायोमीच्या विषमुक्त शेती अभियान आणि कृषी साक्षरता अभियानात सहभागी होऊया.

अधिक माहितीसीठी बायोमी कंपनीच्या या 9559195005 व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा किंवा मेसेज पाठवावा.

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *