भेंडी लागवडीसाठी सुधारित जाती

भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे वर्षभर भेंडीची लागवड केली जाते. भेंडी चवीला चांगली लागत असल्याने सर्वांचीच आवडती भाजी असते. भेंडीच्या पिकात अ ब आणि क जीवनसत्वे तसेच मॅग्नेशिअम फास्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम कर्बोदके व लोह इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. भेंडी पिकामध्ये सर्वाधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. भेंडी मध्ये असणाऱ्या लोहामुळे रक्तातील हिमोलोबीन वाढीस लागतो. वर्षभर बाजारामध्ये कायम चांगली मागणी असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो. भेंडीच्या खालील सुधारित जातींच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवू शकतात.

सुधारित जाती –
महिको 10 – ही सर्वात जास्त महाराष्ट्रातले लोकप्रिय जात असून या जातीची फळे गडद हिरव्या रंगाचे असतात व हेक्‍टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.

परभणी क्रांती – मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या ठिकाणी ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीची भेंडी कोवळी, हिरवी किंवा लांब असते. या जातीची लागवडीनंतर 50 ते 55 दिवसात उत्पादन मिळते.

पुसा सावनी – भेंडीची ही जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापरली जाते. या जातीची भेंडी दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब आणि हिरव्या रंगाची असते. उन्हाळी व खरीप हंगामासाठी लागवडीस योग्य. या जातीतून एका हेक्टर मधून आठ ते दहा टन उत्पादन मिळू शकते.

अर्का अनामिका – ही उंच वाढणारी जात असून फळे लांब व कोवळी असतात. या भेंडीचा रंग हा गर्द हिरवा असून फळांचे देठ लांब असतात.या जातीतून हेक्टरी 9 ते 12 टन उत्पादन मिळते

Krishi Charcha Marathi

Krishi Charcha Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *